Saturday, 26 December 2015

हिवाळ्यातील आजार

हिवाळ्यातील आजार



कफामुळे होणारे आजार लवकर बरे होतात .पित्त वाढल्यामुळे होणारे आजार जरा  जास्त प्रयत्नांनी बरे होतात  पण वातविकार बरे करायला कठीण असतात . 
आयुर्वेदाने ऋतुमानानुसार आहारात बदल केल्यास निरोगी जीवन जगता येते असे सांगितले आहे . पूर्वी आजसारखे  व्हिटामिन ,प्रोटीन हे जरी सर्वज्ञात नव्हते , तरी आयुर्वेदात लघुआहार  गुरुआहार अशी विभागणी आढळते . 
शिवाय प्रत्येक देशातील हवामानाला अनुसरून आहार केला पाहिजे. ज्या ठिकाणी  पाण्याची मुबलकता असते तेथे लोकांना  कफविकार जास्त आढळतात . तर कोरड्या हवामानातील प्रदेशात वातविकार वा पित्तविकार आढळतात


हिवाळ्यातील आजार :-

मुळव्याध(बवासीर,piles ):
बवासीर का दवा के लिए चित्र परिणाम

हिवाळ्यातील आजारात सर्वात वरचा क्रमांक मुळव्याध या आजाराचा लागतो . कोणाला सागाता ही येत नाही. 
अवघड जागेचे दुखणे . पण योग्य आहाराने बरे होणारे दुखणे आहे . 
कारणे :

  • अधिकवेळ एकाच जागी बसल्यामुळे ,
  • जास्त गरम मीरचीवाले पदार्थ खाल्यामुळे 
  • खूप वेळ गाडित बसल्यामुळे किवा मोटर बाइक चालवण्यामुळे
  • पाणी कमी पिण्यामुळे 
  • जास्त मद्य सेवन केल्यामुळे 
  • स्ट्रेस आणि मानसिक अस्वास्थ  हि कारणीभूत ठरतात . 
  • स्थूलपणामुळे तसेच निराहार उपवास केल्यामुळेही हा आजार होतो .    




उपचार:- 
नागकेशर,लोणी,साखर टाकून एकजीव करून दिवसातून ४/५ वेळा घेतल्यास त्वरित आराम पडतो . 
ताज्या ताकात सैधव मीठ टाकून प्याल्यास लगेच आराम पडतो . 
रेशेयुक्त भाज्या कंदमुळे आहारात घेणे . जसे कि गजर, मुळा ,बिट ,सुरण' यांच्या सेवनाने आराम पडतो . 
तिखट, तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत . नियमित मुळा , गाजर खावे . 
रात्री झोपताना आवलाचुर्ण कोमात पाण्याबरोबर घ्यावे . 
नारळाची कीशी जाळून त्याची चमचाभर राख (भस्म) पेलाभर दह्याबरोबर रिकाम्या पोटी घेतल्यास तो रामबाण उपाय ठरतो . 
हिवाळ्यात जेवणात थोडे तीळ 'मेथीदाणा जरूर वापरावेत 
नारळपाणी, सुप्स ,ताक ,भरपूर पाणी जरूर घ्यावे . 
दुध आणि केळ्याचे  शिखरण सेवन करावे .
पालक मेथी,कारले, आले , कांदा यांचा वापर आहारात  जास्त करावा . 
पिंपळी चुर्ण मधाबरोबर घ्यावे . 
तुरडाळ या आजाराला कुपथ्य आहे . 
तसेच वातट भाज्या जसे कि वांगी,गावार , बटाटा  वर्ज्य कराव्यात . 
शक्यतो स्ट्रेस फ्री राहावे . रात्री जागरण करू नये . सतत एका जागी बसू नये . नियमित व्यायाम करावा  
बाहेरील तेलकट पदार्थ पिज्झा ,सामोसा वडापाव खावू नये. 



रोग झाल्यावर डॉक्टरकडे धावण्यापेक्षा  रोग होऊ नये म्हणून काळजी घेतलेली जास्त बरी नाही का ?








बवासीर का दवा के लिए चित्र परिणाम













Tuesday, 15 December 2015

AAJAR AANI UPACHAR

आजार आणि उपचार 


AYURVEDA साठी प्रतिमा परिणाम

उन्हाळा , पावसाळा , हिवाळा  हे भारतातील प्रमुख  ऋतू  आहेत . माणसाचे शरीर हे तीन  तत्वांनी  बनलेले आहे . वात, पित्त,आणि  कफ. 

आजार झाल्यावर धावण्यापेक्षा  आजार होऊ  नये  याची खबरदारी घेतली तर बराच ताण( मानसिक आणि आर्थिक )त्रास कमी होईल . 

भारताची भोगोलिक  परिस्थिती  उष्ण कटिबंधातील  आहे  म्हणजे  थोडी काळजी आहाराबाबत घेतली तर 
कोणतेच आजार शक्यतो होणार नाही

 AYURVEDA साठी प्रतिमा परिणाम


आपल्याकडे आयुर्वेदात आहार कसा घ्यावा याबाबत बरेच नियम घातले आहेत . ते थोडेतरी पाळले तर मोठमोठे आजार बरे होऊ शकतात  आणि झाले असतील तर आटोक्यात येऊ शकतात . 

AYURVEDA साठी प्रतिमा परिणाम


वात, पित्त आणि कफ  यामुळे होणारे आजार काळजी व उपचार पाहूया