हिवाळ्यातील आजार
कफामुळे होणारे आजार लवकर बरे होतात .पित्त वाढल्यामुळे होणारे आजार जरा जास्त प्रयत्नांनी बरे होतात पण वातविकार बरे करायला कठीण असतात .
आयुर्वेदाने ऋतुमानानुसार आहारात बदल केल्यास निरोगी जीवन जगता येते असे सांगितले आहे . पूर्वी आजसारखे व्हिटामिन ,प्रोटीन हे जरी सर्वज्ञात नव्हते , तरी आयुर्वेदात लघुआहार गुरुआहार अशी विभागणी आढळते .
शिवाय प्रत्येक देशातील हवामानाला अनुसरून आहार केला पाहिजे. ज्या ठिकाणी पाण्याची मुबलकता असते तेथे लोकांना कफविकार जास्त आढळतात . तर कोरड्या हवामानातील प्रदेशात वातविकार वा पित्तविकार आढळतात
हिवाळ्यातील आजार :-
मुळव्याध(बवासीर,piles ):
हिवाळ्यातील आजारात सर्वात वरचा क्रमांक मुळव्याध या आजाराचा लागतो . कोणाला सागाता ही येत नाही.
अवघड जागेचे दुखणे . पण योग्य आहाराने बरे होणारे दुखणे आहे .
कारणे :
- अधिकवेळ एकाच जागी बसल्यामुळे ,
- जास्त गरम मीरचीवाले पदार्थ खाल्यामुळे
- खूप वेळ गाडित बसल्यामुळे किवा मोटर बाइक चालवण्यामुळे
- पाणी कमी पिण्यामुळे
- जास्त मद्य सेवन केल्यामुळे
- स्ट्रेस आणि मानसिक अस्वास्थ हि कारणीभूत ठरतात .
- स्थूलपणामुळे तसेच निराहार उपवास केल्यामुळेही हा आजार होतो .
उपचार:-
नागकेशर,लोणी,साखर टाकून एकजीव करून दिवसातून ४/५ वेळा घेतल्यास त्वरित आराम पडतो .
ताज्या ताकात सैधव मीठ टाकून प्याल्यास लगेच आराम पडतो .
रेशेयुक्त भाज्या कंदमुळे आहारात घेणे . जसे कि गजर, मुळा ,बिट ,सुरण' यांच्या सेवनाने आराम पडतो . तिखट, तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत . नियमित मुळा , गाजर खावे .
रात्री झोपताना आवलाचुर्ण कोमात पाण्याबरोबर घ्यावे .
नारळाची कीशी जाळून त्याची चमचाभर राख (भस्म) पेलाभर दह्याबरोबर रिकाम्या पोटी घेतल्यास तो रामबाण उपाय ठरतो .
हिवाळ्यात जेवणात थोडे तीळ 'मेथीदाणा जरूर वापरावेत
नारळपाणी, सुप्स ,ताक ,भरपूर पाणी जरूर घ्यावे .
दुध आणि केळ्याचे शिखरण सेवन करावे .
पालक मेथी,कारले, आले , कांदा यांचा वापर आहारात जास्त करावा .
पिंपळी चुर्ण मधाबरोबर घ्यावे .
तुरडाळ या आजाराला कुपथ्य आहे .
तसेच वातट भाज्या जसे कि वांगी,गावार , बटाटा वर्ज्य कराव्यात .
शक्यतो स्ट्रेस फ्री राहावे . रात्री जागरण करू नये . सतत एका जागी बसू नये . नियमित व्यायाम करावा
बाहेरील तेलकट पदार्थ पिज्झा ,सामोसा वडापाव खावू नये.
रोग झाल्यावर डॉक्टरकडे धावण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून काळजी घेतलेली जास्त बरी नाही का ?